भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागातर्फे ‘सुरक्षित तट’ या नावाने एक सायकल सफर आयोजित करण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या दमण विभागाच्या कमांडिंग ऑफिसरनी या सफरीचं आज उदघाटन केलं. या सफरीत सहभागी झालेले २० सायकलस्वार गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोवा या राज्यांच्या किनारपट्टीवर २१ दिवसांमध्ये १८६० किलोमीटरचं अंतर कापणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, सागरी दक्षता, आणि सामाजिक कल्याण या मूल्यांप्रती तटरक्षक दलाची वचनबद्धता या उपक्रमातून दिसून येते असं तटरक्षक दलाने म्हटलं आहे.
Site Admin | February 2, 2025 7:41 PM | akashavani
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागातर्फे ‘सुरक्षित तट’ या नावाने एक सायकल सफर आयोजित
