डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 12, 2024 9:35 AM

printer

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरच्या आरोपांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक सदस्यीय समिती नेमली आहे. कर्मिक मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. पूजा खेडकर या 2023च्या तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांच्यावर गैरवर्तणूक तसंच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिलेल्या प्रमाणपत्राबाबत आरोप आहेत; याच संदर्भात ही समिती चौकशी करणार असून आपला अहवाल दोन आठवड्यात सादर करणार आहे. खेडकर यांनी त्यांचं प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच स्वतंत्र कक्ष, वाहन, निवासी सुविधा अशा मागण्या केल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. त्यांच्या या विनंत्या नाकारण्यात आल्या असून, त्यांची पुण्याहून वाशिम इथं बदली करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा