शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जमा केलेली गुरे न्यायालयाचा आदेश मिळालेला नसतानाही गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट हमीपत्र करुन विकली. या प्रकरणात ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांची विक्री झाली. लाखनी पोलिसांनी पाचही गोशाळांच्या एकूण ३३ जणांवर शासकीय मालाची अफरातफरीचा गुन्हा नोंदवला आहे.