महावितरणच्या धुळे मंडळ कार्यालयानं केलेल्या कारवाईत एका हॉटेलनं १४ लाख रुपयांची वीज चोरी केल्याचं उघड झालं. त्यानंतर या हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय धुळे शहर परिसरात अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये औद्योगिक, व्यापारी वीज चोरी होत असल्याची अनेक प्रकरणही आढळून आली.
१६ दक्षता विभागातील भरारी पथकांच्या सहाय्यानं महावितरणनं ही कारवाई केली. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महावितरणनं दिला आहे.