केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयच्या उप अधीक्षकासह अन्य काही जणांविरुद्ध लाच मागितल्याचा आणि विविध बँक खात्यांच्या तसंच हवालाच्या माध्यमातून ती स्वीकारल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयच्या बँक सिक्युरिटीज आणि अपहार शाखेचे अधीक्षक बी. एम. मीना यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला असल्याचं सीबीआयच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. हा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर जयपूर, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्लीत २० ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यामध्ये ५५ लाख रुपयांची रोख रक्कम, मालमत्तेची कागदपत्रं हस्तगत करण्यात आल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | January 3, 2025 2:16 PM | CBI