उत्तर भारतातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरली आहे. दिल्ली एनसीआर भागात आज सकाळी दाट धुकं आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि राजस्थान भागात रात्रीच्या वेळी तसंच उद्या सकाळी दाट धुकं राहील.
हिमालयाच्या पश्चिम प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असून पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.