डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

राज्य सरकार सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज दिल्ली इथं आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील  पवार यांनी दिली

 

दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांना बोलता भेटता यावं यासाठी स्थान निर्माण केलं जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं. तुळापूर आणि वढू इथं छत्रपती संभाजी महाराजांचं दिमाखदार स्मारक व्हावं यासाठी सरकार काम करत असल्याचं सांगत पवार यांनी संभाजी महाराजांच्या साहित्यप्रेमाचं आणि साहित्यकृतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संमेलन समाजातल्या  सर्व घटकांपर्यंत पोहोचायला हवं, आधुनिक ज्ञान-विज्ञान मराठी भाषेत उपलब्ध व्हायला हवं, असं ते म्हणाले. नवोदित साहित्यकांना प्रोत्साहन मिळण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली. 

 

महाराष्ट्रभूमीसाठी सदैव झटत राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तालकटोरा स्टेडिअमला असलेल्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करून  मराठी सारस्वतांनी आज आपल्या विचारांनी दिल्ली जिंकली असल्याचं, शिंदे म्हणाले. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात  कुसुमाग्रज अध्यासन केंद्र लवकरच होईल, असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. प्रवासी साहित्य संमेलन दरवर्षी व्हावं, त्यासाठी कुठलीही कमतरता भासणार नाही, असंही सामंत यांनी सांगितलं.

 

मराठी भाषा वाढायची असेल तर आपल्या घराघरातली मुलं मराठी शिकायला हवीत, असं ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी म्हटलं आहे.  दिल्ली इथं आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात त्या बोलत होत्या.  प्राथमिक शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे तर मराठी भाषेला  उर्जितावस्था येईल, असं सांगताना मराठी भाषा टिकण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न त्यांनी मांडले

सर्वाधिक वाचले

सर्व पहा