डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित

दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित केलं आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे यांचं नाव दिलं आहे, तर रेल्वे बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची नावं दिली आहेत. 

 

या संमेलनाचा प्रारंभ आज पुणे रेल्वे स्थानकावर झाला. मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ,  आदी मान्यवर उपस्थित होते . ‘गर्जा महाराष्ट्र माझा‌’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघाली. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली होती. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी देखील या विशेष रेल्वेद्वारे साहित्यिकांसोबत प्रवास केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा