९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला २१ फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. यासाठी ताल कटोरा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी उभारण्यात आली असून इथल्या विविध सभामंडपांना महाराष्ट्राल्या महान व्यक्तीमत्वांची नावं देण्यात आली आहेत. २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन ,मुलाखत, परिसंवाद असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या आम्ही असू अभिजात या संमेलन गीताचं प्रकाशन काल मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि या गीताचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर, संगीतकार आनंदी विकास, गायक मंगेश बोरगावकर, समन्वयक विकास सोनताटे, तसंच सरहद संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. ऐकूया या गीताची एक झलक,