९७ वा अकादमी पुरस्कार सोहळा काल अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये संपन्न झाला. शॉन बेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनोरा या चित्रपटाने सर्वात जास्त ५ पुरस्कार जिंकले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले.
‘द ब्रुटलिस्ट’ साठी अॅड्रियन ब्रॉडी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता या ऑस्करचा मानकरी ठरला. तर मिकी मॅडिसननं ‘अनोरा’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला.
‘अॅमिलिया पेरेझ’ मधल्या भुमिकेसाठी झोई साल्दाना हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. तिचा हा पहिला अकादमी पुरस्कार आहे. ‘अ रिअल पेन’ मधल्या अभिनयासाठी किरन कल्किननं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर जिकंला. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा ऑस्कर ‘नो अदर लँड’ ला मिळाला
‘अनुजा’ या भारतीय लघुपटाला लाइव्ह अॅक्शन लघुपटाच्या श्रेणीत ऑस्कर २०२५ साठी नामांकन मिळाले होतं. मात्र आय अॅम नॉट रोबोट’ या चित्रपटाला या श्रेणीत ऑस्कर मिळाल्यामुळे भारताची ऑस्कर पुरस्कार मिळवण्याची संधी हुकली आहे.