बांग्लादेश मध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षात काल १३ पोलिस कर्मचाऱ्यांसह ९० जण ठार झाले. तर अनेक जखमी झाले आहेत. आरक्षण विषयक सुधारणा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी काल देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं आहे. देशात चळवळीदरम्यान झालेल्या ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेऊन सरकारनं राजीनामा देण्याची मागणी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. बांग्लादेश सरकारनं काल ढाका आणि देशाच्या इतर काही भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली. दरम्यान, बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी त्यांच्या निवासस्थानी गणभवन इथं सुरक्षाविषयक राष्ट्रीय समितीची बैठक घेतली.
Site Admin | August 5, 2024 2:49 PM | banglade | banglade aarakshan | bangladesh arakshan | violent conflict