डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आठव्या भारत जल सप्ताह 2024ला नवी दिल्लीत प्रारंभ

आठव्या भारतीय जल सप्ताहाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 400 देशांतील दोनशे परदेशी प्रतिनिधींसह सुमारे चार हजार इतर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनादरम्यान शंभराहून अधिक प्रदर्शक आणि स्टार्टअप्स पाणी क्षेत्रातील आपल्या कल्पना सादर करणार आहेत. आठवा भारत जल सप्ताह कार्यक्रम जगभरातील जलसंपत्ती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील निर्णयकर्ते, संशोधक, तज्ञ, नवप्रवर्तक आणि भागधारकांकडून विचार आणि मते जाणून घेण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करेल. ‘सर्वसमावेशक जलविकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य’ असं या कार्यक्रमाचं सूत्र आहे. पंचायती राज मंत्रालय या कार्यक्रमात भागीदार मंत्रालय म्हणून सहभागी होणार आहे. आठव्या भारतीय जल सप्ताहात देशभरातील ग्रामपंचायतींकडून जल व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा