डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ आणि जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद अर्थात आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ही परिषद भारत मंडपम इथं होत आहे. यामध्ये सहभागी उद्योगक्षेत्रातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया बाबतच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली.

 

“तिसऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधानांनी इंडियन मोबाइल काँग्रेस (आयएमसी) ला नाविन्यपूर्ण आणि सहकार्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून स्थान दिलं असल्यामुळे डिजिटल क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे,” असे गौरवोदगाऱ रिलायन्स जिओ-इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल त्यांची प्रशंसा करताना काढले. “खऱ्या परिवर्तनाची सुरुवात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने झाली,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेचा आढावा घेताना भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा