केंद्रीय आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरात नागरी तसंच संरक्षण क्षेत्रांतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालयं उघडण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अकोला, पुण्यातील एनडीआरएफ परिसर, सुदुंबरे आणि रत्नागिरीतील नाचणे भागात प्रत्येकी एक अशा तीन विद्यालयांचा समावेश आहे. 85 नवीन केंद्रीय विद्यालयांच्या स्थापनेसाठी एकंदर 5 हजार 872 कोटी रुपये 2025-26 पासून आठ वर्षांच्या कालावधीसाठी तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत 1256 केंद्रीय विद्यालयं कार्यरत आहेत, यामध्ये परदेशात मॉस्को, काठमांडू आणि तेहरानमधील प्रत्येकी एका विद्यालयाचा समावेश आहे आणि साडेतेरा लाखांहून अधिक विद्यार्थी त्यामध्ये शिकत आहेत. या समितीनं नवोदय विद्यालय योजनेअंतर्गत देशभरात 28 नवोदय विद्यालयं स्थापन करण्यासही मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रातील ठाणे इथल्या विद्यालयाचा समावेश आहे.
Site Admin | December 7, 2024 10:09 AM | केंद्रीय विद्यालयं | महाराष्ट्र