हिंदी भाषा सर्वांना एकत्र आणण्याचं काम करते तसंच एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेकरता महत्वाची भूमिका बजावण्याचं काम करते असं प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं. ते आज चेन्नई इथं दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या ८३ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. दक्षिण भारत हिंदी प्रचारसभा महात्मा गांधी यांच्या विचारानुसार काम करते, असं सोनोवाल म्हणाले. यावेळी प्रवीण आणि विशारद परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या ८ हजार विद्यार्थ्यांना सोनोवाल यांनी पदवी प्रदान केली. दक्षिण भारत हिंदी प्रचारसभेनं घेतलेल्या परीक्षेतल्या सुवर्ण पदकविजेत्या विद्यार्थ्यांचाही त्यांनी गौरव केला. तसंच तामिळ भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सी सुब्रमणियम यांचाही सोनोवाल यांनी सत्कार केला.
Site Admin | December 7, 2024 5:30 PM | Sarbanand Sonowal