डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारपिंपळगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. मराठवाड्यामध्ये जे आवश्यक आहे, त्या बाबी करून नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून समुद्रात वाया जाणारं पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, हे देशातलं पहिलं सरकार ठरलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जालना जिल्हा अतिवृष्टी अनुदानातून वगळण्यात येणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्ल्यू सफायर कंपनीच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. हिकमत उढाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा