सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं काल मालगाडी आणि चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन महीला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अन्य एका अपघातात धुळे-सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळा फाट्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त मालवाहू गाडीला चारचाकी वाहनानं पाठीमागून धडक दिल्यामुळं एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हे दोन्ही अपघात देवदर्शनाच्या प्रवासादरम्यान घडले असल्याचं आमच्या बातमीदारांनी म्हटलं आहे.
Site Admin | January 2, 2025 9:59 AM | accidents