दक्षिण लेबनॉनमध्ये काल हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे आठ सैनिक ठार झाल्याचं इस्त्रायलच्या सैन्यानं सांगितलं आहे. इस्रायलनं सैनिकी कारवाई केल्यानंतर उत्तरादाखल हिजबुल्लानं हा हल्ला केला. एका व्हिडिओ संदेशात इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. इराणलाही याचे परिणाम भोगावे लागतील. इस्रायलची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचही त्यांनी वचन दिलं. इस्रायली हवाई दलाने बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील हिजबुल्लाच्या तळावर रात्रभर हल्ले केले. गेल्या २४ तासात इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान ५५ जणांचा मृत्यू आणि १५६ जण जखमी झाल्याची लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. तसंच गेल्या दोन आठवड्यांत १ हजारापेक्षा जास्त मृत्यू आणि सुमारे दहा लाख लोक विस्थापित झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, इराण युद्धाचा प्रयत्न करत नाही, परंतु इस्रायलने हल्ला केला, तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल.
Site Admin | October 3, 2024 1:29 PM | Hezbollah | Israel | Lebanon
दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे ८ सैनिक ठार
