डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे ओमानजवळ समुद्रात बुडालेल्या टँकरवरील 8 भारतीयांची सुटका

ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं 8 भारतीयांसह नऊ क्रू सदस्यांची सुटका केली आहे. एमव्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर 13 भारतीय आणि श्रीलंकेचे तीन असे एकंदर 16 कर्मचारी होते. उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. तेग या युद्धनौकेसोबतच एक P-8I हे सागरी गस्ती विमान ओमानमध्ये शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. आपण ओमानच्या अधिका-यांच्या सतत संपर्कात असून ओमानचं सागरी सुरक्षा केंद्राकडून शोध आणि बचाव कार्याचं समन्वयन करण्यात येत असल्याचं तिथल्या भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा