पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला साडे आठ कोटी रुपये देण्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी केली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या आर्थिक मदतीबद्दल शाह यांचे आभार मानले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात ७० पुरुष आणि ४७ महिलांसह ११७ खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या महिन्याच्या २६ तारखेपासून सुरू होणार आहे.
Site Admin | July 22, 2024 1:45 PM | BCCI. olympic