डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नवी दिल्लीत नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरच्या ७ वी उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरची ७ वी उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतातली अमली पदार्थांची तस्करी आणि गैर वापर रोखण्यासाठी काम करत असलेल्या विविध केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. 

 

अमली पदार्थांच्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारनं अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं गृहामंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

 

संस्थात्मक संरचना मजबूत करणं, अमली पदार्थ विरोधी उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये समन्वय वाढवणं आणि व्यापक जनजागृती मोहीम सुरू करणं, या त्रीसूत्रीच्या मदतीनं २०४७ या वर्षापर्यंत भारताला अमली पदार्थ मुक्त करण्याचं सरकरचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा