डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

७७ वा लष्कर दिन सर्वत्र साजरा-संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात मुख्य संचलन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ७७ वा लष्कर दिन काल साजरा झाला. १९४९ मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती.

राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन पुण्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी झालेल्या गौरवगाथा या कार्यक्रमात बोलतांना, लष्कर दिन हा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या सैनिकांचा गौरव असल्याचं प्रतिपादन राजनाथसिंह यांनी केलं.
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या संचलनात लष्कर दलाचे सैनिक, पोलीस दल आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या राज्य महिला पथकाचा संचलनात सहभाग होता.

नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथल्या राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयात लष्कर दिनानिमित्त हवाई दलातल्या विमानांच्या प्रतिकृती रेडिओ कंट्रोलद्वारे उडवून चित्तथरारक कवायतींचं प्रात्याक्षिक दाखवण्यात आलं. मिग-२१, जॅग्वार, मिराज-२०००, मिग-२९, सुखोई-३०, तेजस आणि रायफल यासह उडता मासा आणि उरी या चित्रपटात रेकी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गरुड पक्षाची प्रतिकृतींचा यात समावेश होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा