प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे. सुमारे ४० विमानं कर्तव्यपथावर विविध कसरतींचं प्रदर्शन करतील. यंदा मिग २९, राफेल, सुखोई ३०, जग्वार, अपाचे, C-130 आणि C – 17 यासारखी लढाऊ विमानं सादरीकरणात भाग घेतील.
याशिवाय हवाई दलाची एक तुकडी सुद्धा कर्तव्यपथावर प्रदर्शन करेल. १४८ जवानांच्या या तुकडीचं नेतृत्व स्कान्ड्रन लीडर महेंद्र सिंह हे करणार आहेत.