डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 17, 2024 10:25 AM | Indian Students

printer

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर मागास घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणाची मोठी सोय होणार असल्याचं, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सावे यांच्या हस्ते इतर मागास वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या वसतीगृहाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या वसतीगृहात ज्यांना प्रवेश मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांना सावित्री बाई फुले आधार योजना आणि स्वयंम योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा