भारतीय सेना स्वदेशीकरण तसंच अत्याधुनिकीकरण यामध्ये अग्रेसर असल्याचं लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी आज सांगितलं. ७७ व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच १५ जानेवारी रोजी होणाऱ्या लष्कर दिन सोहोळ्याची रंगीत तालीम पार पडली. या कार्यक्रमाला माजी सैनिक तसच वीर पत्नी उपस्थित होत्या.
पुण्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ७७ व्या लष्कर दिन सोहळ्यात नेपाळ लष्कराचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. लष्कर दिन सोहोळ्यात एकंदर ७ वाद्यवृंद सहभागी होणार आहेत. ३३जणांच्या नेपाळी वाद्यवृंदामध्ये ३ महिला संगीतकारांचा समावेश आहे.