परदेशी गंगाजळीमध्ये 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडून भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड नंतर परदेशी गंगाजळीमध्ये 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडणारी, भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ होऊन 27 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ती 704 अब्जावर गेली आहे. 20 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 2 अब्ज 8 कोटीनी वाढून 692 अब्ज 3 कोटी डॉलरवर पोहोचला होता. परकीय चलन साठयात या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय चलनाला अधिक स्थिरता मिळाली आहे. रिजर्व बँकेनं काल जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा सोन्याचा साठा सुमारे 2 अब्ज 18 कोटी डॉलर्सनं वाढून तो आता 65 अब्ज 79 कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे.
Site Admin | October 5, 2024 11:14 AM | 700 billion dollar | forex reserves