नाशिकमध्ये द्वारका भागात परवा रात्री झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या आता ७ झाली आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. राज्य शासनानं मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्चही शासनातर्फे करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलीसांनी यासंदर्भात वाहन चालक, मालक आणि स्टील पुरवठादार कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.