मूल्याकंन वर्ष २०२४- २५ साठी ३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांनी आयकर विवरणपत्र दाखल केल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या साडे सात टक्क्यांनी अधिक असल्याचं मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यंदा विवरणपत्र दाखल करणाऱ्यांपैकी सुमारे ५ कोटी २७ लाख जणांनी नव्या करप्रणालीनुसार, तर २ कोटी १ लाख जणांनी जुन्या करप्रणालीनुसार विवरणपत्र दाखल केलं आहे. विवरणपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ जुलैला सर्वाधिक ६९ लाख ९२ हजार विवरणपत्र दाखल करण्यात आली. यावर्षी ५८ लाख ५७ हजार जणांनी प्रथमच आयकर विवरणपत्र दाखल केलं.
Site Admin | August 2, 2024 7:06 PM | Ministry of Finance