दक्षिण फिलिपिन्सच्या सुलतान कुदरत प्रांतांत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, अशी माहिती फिलिपिन्सच्या भूकंपमापन आणि ज्वालामुखी शास्त्र संस्थेनं दिली आहे. फिलिपिन्सच्या किनारी भागापासून नैऋत्येला १३३ किलोमीटरवर आणि भूगर्भाखाली ७२२ किलोमीटरच्या आसपास भूकंपाचं केंद्र होतं. प्रशांत महासागराभोवतालच्या भूकंपप्रवण क्षेत्रात हा भाग येत असल्यानं इथं वारंवार भूकंपाचे धक्के बसतात, मात्र यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा त्सुनामी येण्याची शक्यता नाही, अशी माहिती देखील या संस्थेनं दिली आहे.
Site Admin | July 11, 2024 8:42 PM | earthquake | Philippines