संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं सिंगापूरचे संरक्षण मंत्री डॉ. एनजी इंग्ज हेन यांच्या बरोबर ‘सहाव्या भारत-सिंगापूर संरक्षण मंत्री संवादाचं ‘ सह-अध्यक्षपद भूषवलं. दोन्ही देशांमधली सामायिक धोरणात्मक भागीदारी, परस्परांबरोबरच्या वाढत्या संबंधांचं द्योतक असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.
भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचं हे दहावं वर्ष असून, सिंगापूरच्या दृष्टीनं भारत हा नेहमीच पूर्वेचा भाग असल्याचं डॉ. एनजी इंग्ज हेन यांनी यावेळी नमूद केलं.