डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पाकिस्तानातल्या ६८ हिंदू भाविकांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नाान

कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या ६८ हिंदू भाविकांचा जत्था काल प्रयागराज इथं पोहोचला आणि त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर या भाविकांनी आपल्या पुर्वजांसाठी धार्मिक विधी आणि प्रार्थना केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना यात्रेकरूंनी कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आपल्याला त्वरित व्हिसा जारी केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. यात्रा स्थळी त्यांनी विविध शिबिरांना भेट दिली आणि कुंभमेळ्याच्या एकूण आयोजनाची प्रशंसा केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा