६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पंजाबच्या गनेमत सेखन हिनं महिलांच्या स्किट प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. गनेमतचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं सुवर्णपदक आहे. स्किट प्रकारात पंजाबच्याच असीस छिना हिला रौप्यपदक मिळालं तर रायझा ढिल्लों हिला कांस्य पदक मिळालं. पुरुषांच्या स्किट प्रकारात भवतेग सिंग गिल यानं ६० पैकी ५४ लक्ष्यांचा अचूक भेद करत सुवर्णपदक पटकावलं. फतेहसिंग शेरगिल याला रौप्य तर मिराज अहमद खान याला कांस्य पदक मिळालं. स्किट प्रकारात पुरुषांच्या कनिष्ठ गटात हरियाणाच्या इशान सिंग लिब्रा यानं सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीत भवतेग सिंग आणि इशान दोघांनाही ५२ गुण मिळाले त्यानंतर झालेल्या निर्णायक शूट ऑफमध्ये ६-५ अशा गुणांनी इशाननं विजेतेपद मिळवलं. स्किट प्रकारात महिलांच्या कनिष्ठ गटात रायझा ढिल्लों हिनं सुवर्णपदक मिळवलं. वनिष्का तिवारीला रौप्य तर यशस्वी राठोडला कांस्यपदक मिळालं.
Site Admin | December 25, 2024 10:37 AM | 67th National Shooting Championship