गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात रक्कम वर्ग केला गेला आहे. यानंतर आता येत्या सोमवार पासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केला जाणार आहे. गेल्या रब्बी हंगामात गोंदिया जिल्हा विपणन महासंघानं जिल्ह्यातल्या ११ हजार ६०५ शेतकऱ्यांकडून ५ लाख १२ हजार क्विंटल इतक्या धान्याची खरेदी केली होती.