राज्यातल्या १९३ एसटी बसस्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरी जिल्ह्यात पाली इथं तीन कोटी ३४ लाख रुपये खर्च करून नव्यानं उभारलेल्या एसटी बसस्थानकाचं लोकार्पण काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
‘गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यामधल्या बसस्थानकांच्या सुशोभिकरणासाठी १० कोटी रुपये दिले असून, रत्नागिरी, जाकादेवी, पावस, लांजा, गणपतीपुळे आदी ठिकाणच्या बसस्थानकांच्या विकासासाठी औद्योगिक विकास महामंडळानं ८० कोटी मंजूर केले आहेत,’ असं सामंत यांनी यावेळी सांगितलं. बसस्थानकावरचा हिरकणी कक्ष वातानुकुलित करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही ते म्हणाले.