चीनमध्ये आजपासून येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत नवव्या आशियाई हिवाळी क्रीडास्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतल्या भारतीय तुकडीत ८८ जणांचा समावेश आहे. यात ५९ खेळाडू आणि २९ संघ अधिकारी आहेत. यंदा प्रथमच, अल्पाइन स्कीइंग, क्रॉस-कंट्री स्कीइंग, फिगर स्केटिंग, शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग आणि लाँग ट्रॅक स्पीड स्केटिंग या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा महासंघ संपूर्ण अर्थसहाय्य देणार आहे.
Site Admin | February 7, 2025 1:36 PM | आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा | चीन | भारत
चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या ५९ खेळाडूंचा सहभाग
