दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. या रेल्वेंमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रक प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावरून किंवा NTES ऍपच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतील.
Site Admin | October 20, 2024 1:20 PM | ChhathPuja2024 | Diwali 2024