जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ५७ टक्के मतदान झालं. सहा जिल्ह्यातल्या २६ मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं. श्री माता वैष्णो देवी मतदारसंघात सर्वाधिक ८० पूर्णांक ७४ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली, तर सुर्णकोट मध्ये ७४ पूर्णांक ९५ शतांश आणि पूँछ हवेली मध्ये ७४ पूर्णांक ६६ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी समाधान व्यक्त केलं. केंद्रशासित प्रदेशातल्या नागरिकांनी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान १ ऑक्टोबरला होणार असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
Site Admin | September 26, 2024 2:07 PM | #JammuKashmirElections2024