डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गोव्यात सुरु असलेल्या ईफ्फी चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार

गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. प्रादेशिक चित्रपटांमध्ये संस्कृतीचं दर्शन होत असल्याचं केरेबेटे या कन्नड चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते गौरीशंकर एसआरजी यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज सुमारे ७५ चित्रपट दाखवले जाणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस  “हाऊ टू सक्सेड इन न्यू हॉलीवूड” या सत्रात सहभागी होणार आहेत. तर अभिनेत्री क्रिती सॅनन आज संध्याकाळी “चित्रपटातला महिलांचा सहभाग” या विषयावर बोलणार आहे.

गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विख्यात चित्रपट निर्माता आणि अभिनेता राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काल चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यानं विशेष कार्यक्रम सादर केला. राज कपूर यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी एक सशक्त कथा असायची त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहायचा असं मत त्यानं यावेळी व्यक्त केलं. डिसेंबर महिन्यात राज कपूर यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या पुनर्संचयित आवृत्तींचा समावेश असलेला विशेष देशव्यापी चित्रपट महोत्सव आयोजित करणार असल्याचं त्यानं या कार्यक्रमात जाहीर केलं.

इफ्फीमध्ये काल ४८ तासात चित्रपट निर्मिती स्पर्धा आणि फिल्म बाजार या दोन उपक्रमांची सांगता झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा