झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर, आता या टप्प्यात तिथे ५२८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. या टप्प्यासाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी बत्तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तिथे पहिल्या टप्प्यासाठी येत्या १३ नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचारानंही वेग घेतला असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा आज रांचीला भेट देऊन प्रचाराचा तयारीचा आढावा घेतील, तसंच धालभूमगढ, घाटशिला, बरकट्ठा, सिमरीया इथं प्रचारसभांना संबोधित करतील.