केंद्र सरकारच्या अमली पदार्थ आणि नशा मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत, दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि गुजरात पोलिसांनी गुजरातमधून 518 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. गुजरातमधील अंकलेश्वर येथील एका औषध कंपनीतून जप्त केलेल्या या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये आहे.
चौकशीदरम्यान, जप्त केलेली औषधं गुजरातमधील अंकलेश्वर इथून आल्याचं उघड झालं होतं. दरम्यान, आसामच्या करीमगंज जिल्ह्यात, पोलिसांनी मिझोरामकडून आलेल्या वाहनातून अंदाजे साडे चार कोटींचे अंमली पदार्थ, जिल्हा पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.