भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्याचं कंपनी प्रशासनानं जाहीर केलं आहे.
तसंच कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचं आश्वासन कंपनी प्रशासनानं दिलं आहे. दरम्यान, या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.