मणिपूरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल विविध स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर उच्च स्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्रिय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPFच्या ५०अतिरिक्त तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली. राज्यात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आवश्यक ती पावलं उचलावीत अशा सुचना शहा यांनी दिल्या.
Site Admin | November 19, 2024 9:31 AM | Manipur
मणिपूरमध्ये CAPFच्या ५० अतिरिक्त तुकड्या तैनात करणार
