भारतीय न्याय संहिता या नवीन फौजदारी कायद्यांतर्गत 1 जुलै ते 3 सप्टेंबर या कालावधीत आतापर्यंत पाच लाख 56 हजार प्राथमिक तपासणी अहवाल अर्थात एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, असं गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं काल सांगितलं.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे या वर्षी 1 जुलैपासून लागू झाले आहेत. गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे अहवाल या वर्षाच्या १ जुलै ते ३ सप्टेंबर दरम्यान नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस संशोधन आणि विकास संस्था तसंच राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शास्त्र विद्यापीठातर्फे या नवीन तीन फौजदारी कायद्यांबाबत नियमित प्रशिक्षण आणि वेबिनारद्वारे आठ लाखांहून अधिक अधिकाऱ्यांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसंच मोबाइल आणि वेब ॲप्लिकेशन द्वारेदेखील या नवीन फौजदारी कायद्यांचं मार्गदर्शन करण्यात येत आहे.