गोंदियात झालेल्या दृष्टीहीन मुलांच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने गुजरातवर तर मुलींच्या संघाने हरयाणावर विजय मिळवला आहे. दृष्टीहीनांसाठीच्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेचं हे चौथं वर्ष. याआधीच्या वर्षात सिमला, हरयाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये या स्पर्धा झाल्या. यावर्षी महाराष्ट्रात या स्पर्धा भरवण्यात आल्या आणि राज्याच्या दोन्ही संघांनी निर्विवाद यश मिळवलं.
Site Admin | December 29, 2024 6:11 PM
दृष्टीहीन मुलांच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने गुजरातवर तर मुलींच्या संघाने मिळवला हरयाणावर विजय
