जगभरात होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात होतात, असं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं.नवी दिल्ली इथल्या भारत मंडपम इथं आज झालेल्या आंतरराष्ट्रीय सिक्स जी परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे २७५ अब्ज डॉलरचे दीड अब्ज व्यवहार झाले, असं शिंदे यांनी सांगितलं. प्रत्येक नागरिकाची सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त करत,सीक्स जी तंत्रज्ञानात भारत जगाचं नेतृत्व करेल, असंही शिंदे म्हणाले.
Site Admin | October 16, 2024 3:13 PM | digital transactions | Jyotiraditya Shinde