हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे आजपासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या वतीने ४५वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा सुरु होत आहे. या १२-दिवसांच्या द्वैवार्षिक स्पर्धेत १,८०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये खुल्या गटात १९३ राष्ट्रीय संघांनी नोंदणी केली असून महिला गटात 181 संघ सहभागी होणार आहेत. अमेरिके-पाठोपाठ भारत खुल्या विभागात, द्वितीय मानांकित संघ म्हणून प्रवेश करेल. महिला विभागात, भारताच्या द्रोणवल्ली हरिकासारखी सक्षम बुद्धिबळपटू खेळणार आहे. भारताची नवी ग्रँडमास्टर आर. वैशाली ही दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव यांच्याबरोबर संघात सहभागी होणार आहे. जॉर्जियाच्या पाठोपाठ दुसरा मानांकित संघ असलेला भारत या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करेल अशी आशा आहे. यापूर्वीच्या स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या भारतानं खुल्या आणि महिला अशा दोन्हीही गटात, कांस्यपदक जिंकलं होतं.
Site Admin | September 11, 2024 1:56 PM | हंगेरी | ४५वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा