४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचा आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं समारोप होणार आहे. विकसित भारत @२०४७ ही या वर्षीच्या व्यापार मेळाव्याची संकल्पना आहे. या वर्षीच्या व्यापार मेळाव्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, थायलंड, तुर्की आणि यूएईसह अकरा देशांनीही या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात भाग घेतला. यावर्षी झारखंड हे मुख्य आकर्षण असलेले राज्य होते तर बिहार आणि उत्तर प्रदेश हे भागीदार राज्य होते.
Site Admin | November 27, 2024 1:47 PM | India International Trade Fair