विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात – १३, बीड – आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड – नऊ, धाराशिव – चार, तर परभणी जिल्ह्यात आठ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत.
Site Admin | November 13, 2024 10:47 AM | Maharashtra Vidhansabha Election 2024 | State | women officers-employees