डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरू सुरक्षित स्थळी पोहचले

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरूंना रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या लींचोली आणि भिम्बली इथून हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं आहे. विविध ठिकाणांहून सुमारे चौदाशे यात्रेकरू बचाव पथकाच्या मदतीनं पायी चालत सोनप्रयागला पोहचले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्याच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची हवाई पाहणी केली आणि आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

 

दरम्यान, हवामान विभागानं उद्या उत्तर काशी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून उत्तराखंडच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा