डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु – मंत्री नितीन गडकरी

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु झाले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने नवी दिल्ली इथं आयोजित जैव इंधन शिखर परिषदेत आज ते बोलत होते.  इथेनॉल आणि गॅस या दोन्ही इंधनावर चालू शकतील अशी वाहनं लौकरच बाजारात आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. कचऱ्याचं व्यवस्थापन करुन त्याचा जैव इंधनासाठी वापर करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. जैवइंधन आर्थिकदृष्ट्याही किफायतशीर असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही भाषण या कार्यक्रमात झालं. इंधन तेलात इथेनॉलचा वापर वाढवण्याचा भारतातला प्रयोग यशस्वी झाला असून पुढच्या वर्षी इथेनॉलचं प्रमण २० टक्के पर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा